अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील बाळापुर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत परिसरात रानडुकरे मोठ्या प्रमाणात झाली आहेत शेळद ग्रामपंचायत परिसरातील जंगली रानडुकरे यांची विल्हेवाट लावा अशी मागणी बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम तिडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेळद गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाला दिनांक 6 जानेवारी 2023 ला गावठी व जंगली रानडुकराची माहिती देऊन सुद्धा ही कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही व काल दिनांक 16 जानेवारी रोजी गंभीर घटना फातिमा कॉलनी अकोला नाका शेळद या परिसरात घडली आहे. रानटी रानडुकरांनी एक लहान मुलगा व एक ज्येष्ठ नागरिक शेख नबी शेख मेहबूब व मदरशामध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी शेख साहिल शेख समीर यांना गंभीर जखमी केलेले आहे व तसेच शेतातील शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा केले आहे व हे शेळद ग्रामपंचायत रहिवाशी नागरिकांना त्रास सुद्धा देत आहेत या जंगली जनावरामुळे एखादा नागरिक मृत्यू सुद्धा होऊ शकतो शरद ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना निवेदन देऊन सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई शेळद ग्रामपंचायत ने केली नाही किंवा या मोकाट रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागातील कुठल्याच कर्मचाऱ्याला पाचारण केले नाही.
या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडून आला आहे याला जबाबदार सर्वस्वी ग्रामपंचायत आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसात जर संपूर्ण जनावराची विल्हेवाट व जखमी नागरिकांना व शेतीमधील नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई करण्यात देण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत शेळद बहुजन विकास पॅनलचे सदस्य संपूर्ण नागरिक तीव्र आंदोलन करतील पंचायत समिती बाळापूर मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे असा इशारा बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके व ग्रामपंचायत सदस्य तसेच शरद गावातील नागरिकांनी दिला आहे.
निवेदन देते वेळी बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके, सौ. अर्चना सचिन भारसाकळे, तन्विर अहमद गुलाम गौस, नाजीया परविन, आयाज खान सह3 शेळद ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…