महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
पंढरपूर:- क्रिकेट खेळताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक खेळाडू जखमी आणि मयत झाले आहे. त्यात महाराष्ट्र अजुन एका क्रिकेट खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील तावशी या गावात क्रिकेट स्पर्धा सुरू असुन जवळपासच्या अनेक ग्रामीण भागातील संघानी या स्पर्धेत भाग घेतला आहे. नेपातगावचा संघ देखील इतर संघाप्रमाणे या स्पर्धामध्ये सहभागी झाला. नेपातगाव विरुध्द दुसरा संघ अशा क्रिकेटचा सामना सुरु होता. नेपातगाव संघांतील विक्रम क्षीरसागर हा 35 वर्षाचा खेळाडू संघाकडून बॅटिंग करीत होता.
विक्रम क्षीरसागर बॅटिंग करीत असताना समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने चेंडू टाकला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला. विक्रमच्या गुप्तांगाला चेंडू लागताच तो मैदानात कोसळला. घडलेल्या प्रकारानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हलवले मात्र यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र कुणीही प्रोफेशनल साहित्य न वापरल्याने ते अनेकांच्या जीवावर बेतू शकत. क्रिकेट खेळताना म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. गार्ड किंवा हेल्मेट गावांकडे क्रिकेट खेळताना वापरलं जात नाही.
पंढरपुरातील ही घटना देखील सुरक्षेची साधनं न वापरल्यामुळंच घडली आहे. क्रिकेट खेळताना मैदानावर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूंच्या मृत्यूचा काही घटना देखील अलीकडच्या काळात घडल्या आहेत. क्रिकेट हा खेळ असा आहे जो गावागावात, गल्लीगल्लीत खेळला जातो. मात्र क्रिकेट खेळताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं अनेकदा दुर्घटना घडतात. त्यामुळे खेळ खेळण चांगलचं आहे पण हे सगळे मैदानी खेळ खेळताना आवश्यक ती काळजी घेणं हे देखील तेवढंचं गरजेचं आहे. नेकदा स्पर्धांचं आयोजन केलं जातं मात्र तिथं कुठल्याही सुविधा नसतात. प्राथमिक उपचारांची सोय नसते. त्यामुळं खेळाडूंना जीव धोक्यात घालून खेळावं लागतं. त्यामुळं क्रिकेट खेळताना काळजी घेणं आवश्यक आहे.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जानेवारी 2025 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल…
रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक संतापजनक घटना…
आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- उंड्री येथून एक खळबळजनक…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली - NDTV…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध विकास कामे गेल्या…