ठाणे शहरात संस्कृती आर्ट फेस्टिवल २०२३ मोठ्या उत्साहात होणार साजरा !

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- “वसुधैव कुटुंबकम्” वसुधैव म्हणजे आपली पृथ्वी व कुटुंबकम् म्हणजे आपले विश्व. या उद्देशाने सर्वांनी एकत्र येऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा व सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे हे या वर्षीचे उद्दिष्ट आहे.

प्रताप सरनाईक फाउंडेशन, विहंग प्रस्तुत सादर करीत आहेत संस्कृती आर्ट फेस्टिवल दि. २६, २७, २८, २९ जानेवारी उपवन तलाव येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलचे यावर्षीचे हे सातवे वर्ष आहे व या वर्षाची थीम आहे “वसुधैव कुटुंबकम्” (One World One Family) आपण सर्व या सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंदी व उत्साही राहून पर्यावरणाशी जवळीक साधूया, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल हा दरवर्षी होणारा एक मोठा नामांकित महोत्सव आहे. यावर्षी सुद्धा महोत्सवाच्या उद्घाटनाला १००० पेक्षा जास्त शाळकरी मुले उपस्थित राहणार आहेत, तसेच या चार दिवसात ६०० पेक्षा जास्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार आहे. सर्व कलाकार ओपन लीग परिसरातील चार विविध सुसज्जित स्टेजवर आपली कला सादर करणार आहेत तसेच या महोत्सवात भरपूर स्टॉल्स उपलब्ध आहे या स्टॉल्समध्ये हँडीक्राफ्टचे स्टॉल्स व विविध प्रकारच्या खाण्यांचे फूड स्टॉल असल्यामुळे याचा खवय्यांना मनसोक्त आनंद घेता येईल

महोत्सवातील इतर आकर्षण – लाईट व लेझर शो, आर्ट व क्राफ्ट वर्कशॉप, एडवेंचर स्पोर्ट्स, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल ला कोणतेही तिकीट (Entry Fee) नाही.

गेली दोन वर्ष एवढ्या मोठ्या महामारीनंतर सुद्धा यावर्षी हा महोत्सव यशस्वी होण्यामागे मागील सहा वर्षातील महोत्सवातील सर्वांचे परिश्रम व समर्थकांचा मिळालेला पाठिंबा आहे असे श्री पूर्वेश सरनाईक (Executive President) यांनी सांगितले. विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला मागील सहा वर्षांपासून रेमंड रियालिटी, हिरानंदानी ग्रुप, रौनक ग्रुप, दोस्ती ग्रुप,रुणवाल ग्रुप व तसेच अनेक स्पॉन्सर यांचा सहभाग फेस्टिवल यशस्वी करण्यात मोठा वाटा आहे. “आपणा सर्वांना या संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आमंत्रण ! या व फेस्टिवलचा आनंद द्विगुणित करा.”

मुख्य स्टेज पद्मश्री व पद्मभूषण उदित नारायण, डॉक्टर जसबिंदर नरुला, इंडियन आयडल सीजन 12 चा विजेता पवनदीप राजन, मैथिली ठाकूर तसेच इंडियन क्लासिकल सिंगर इत्यादी तसेच तरंग फ्लोटिंग स्टेज सगुण निर्गुण विदुषी कलापिनी कोमकली, सावनी शेंडे, पंडित भीमना जाधव, पंडित अनिदो चॅटर्जी, दीपिका भिड़े भागवत, सारंगी वेदक, संगीत मिश्रा, लिओडेल ऑस्ट्रेलिया हे सर्व कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

6 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

18 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

18 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

18 hours ago