संतापजनक: १९ वर्षीय अविवाहित आईने आपल्याच नवजात बाळाला खिडकीतून फेकले.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पनवेल – येथून एक संतापजनक घटना समोर येत आहे. उलवे येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या नवजात बालकाला जन्म देऊन शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उलवे परिसरात घडली आहे. पोलिसांनी संबंधित १९ वर्षीय अविवाहित युवतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाळाचा जन्म तिच्या चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधातून झाला होता.

उलवे सेक्टर २१ मधील आदिनाथ अपर्ण इमारतीमधील पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या वेळी हे नवजात बालक पडले होते. काय पडले हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी इथे नवजात बालक असल्याचे समजतातच तातडीने पोलिसांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर घडलेल्या घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोलीस दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमधील प्रत्येक घराची चौकशी केल्यावर धक्कादायक घटना आणि वास्तव समोर आले.

आरोपी तरुणी यवतमाळ येथील रहवाशी असून ती मोलकरीण म्हणून काम करत. तिच्यावर ह्या संदर्भात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ३१५ अन्वये मुलाला जिवंत जन्माला येण्यापासून रोखण्यासाठी किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणल्याबद्दल आणि आयपीसी कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहीतीनुसार, १९ वर्षीय मुलीने काही दिवसांपूर्वी आपल्या घरी पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर घरच्या व्यक्तींनी ह्या युवतीला नेरुळमधील मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये पाठवले होते.तिने तिथे एका नवजात बालकाला जन्म दिला होता. मात्र प्रसूतीनंतर ही युवती रात्रीच्या वेळी उलवे येथील घरी आली होती. तिने सामाजिक कलंकातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या नवजात बालकाला शौचालयाच्या खिडकीतून फेकून दिले. ह्या महिलेचे काही वर्षांपासून मामाच्या मुलावर प्रेम होते अशी माहिती हाती आली आहे.पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी बालकाला रुग्णवाहिकेतून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच काही तासापूर्वीच या बालकाचा जन्म झाल्याचे समजले. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी आदिनाथ अर्पण इमारतीमध्ये झाडाझडती सुरू केली. ज्या ठिकाणी मृत बालक सापडले त्यावरील शौचालयाच्या खिडक्या पाहिल्यानंतर एका घराला खिडकीच्या काचा नसल्याचे समोर आले. पोलिसांनी तिथे राहणाऱ्या कुटुंबाची चौकशी केल्यावर या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या गावाकडील दोन महिला नातेवाईक येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

22 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago