महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यातील वडगाव पान येथील एका लॉजवरील वेश्याव्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपअधीक्षकांनी सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला. कारवाईत पोलिसांना येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक बाळासाहेब चत्तर, खेमराज कृष्णराज उपाध्याय दोघेही रा. वडगाव पान, ता. संगमनेर आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.
संगमनेर शहरालगतच्या वडगाव पान शिवारामध्ये वडगाव पान फाटा ते कोपरगाव रोडलगत असलेल्या हॉटेल विशाल गार्डनच्या मागे साईमाया लॉजमधील खोलीत हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांना मदतीला घेत सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान येथे काही परप्रांतीय महिला हा व्यवसाय करताना आढळून आल्या असल्याची माहिती मिळते. तसेच बदलापूर ठाणे येथील एक महिला व आरोपी या महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे कारवाईदरम्यान पोलिसांनी कुंटणखाना चालविण्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…