नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- कल्याण पूर्व विभागातील काकडवाल गावात वीजचोरी शोध मोहिम पथकाला मारहाण करणाऱ्या दुधकर कुटुंबाने तब्बल १७ लाख ६८ हजार ७८० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. दूधकर कुटुंबाने ११ जानेवारीला वीज चोरी शोध मोहिमेतील कार्यकारी अभियंत्यासह दहा अभियंते व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. वीजचोरी केल्याप्रकरणी तिघा दूधकर बंधूंविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंता शनिवार दूधकर, अशोक शनिवार दूधकर आणि प्रकाश शनिवार दूधकर अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करत मीटर टाळून वीजचोरी केल्याचे आढळले. अनंता दूधकर याने ६ लाख ६९ हजार ५५० रुपयांची २८ हजार २५२ युनिट, प्रकाश दूधकर याने ७ लाख २३ हजार ३९० रुपयांची ३० हजार ८६९ युनिट तर अशोक दूधकर याने ३ लाख ५७ हजार ८४० रुपये किमतीची १३ हजार २११ युनिट वीज चोरून वापरल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…