ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्कारा च्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीत बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. ते 17 जाने रोजी शिवतिर्थ जयकीसन कॉलनी भडगाव रोड येथे संक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील, जळगाव महापौर जयश्रीताई महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, कमलबाई पाटील, दिपाली माने, तिल्लोतमा मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मी पाटील सूत्र संचालन राजश्री पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार नर्मदा पांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले,
अनिता पाटील, सुनिता देवरे, कुंदन पांड्या आदीं सह शिवसेना महिला आघाडी पदाधिकारींनी परिश्रम घेतले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…