✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील व्यापारी कैलास जनरल स्टोअर्सचे मालक हेमंत चंदानी यांना लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न सोमवार 16 रोजी रात्री करण्यात आला. एका कारमधून आलेल्या 2 लुटारुंकडून हा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी चंदानी यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार नोंद केली. पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 च्या दरम्यान चंदानी दुकान बंद करून गुरुनानक वार्ड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. स्वतःच्या दुचाकीने शिवाजी वार्ड परिसरातील माता मंदिराजवळ या व्यावसायिकास मागून येणार्या एका कारने ओव्हरटेक केले. कार पुढे जाऊन लगेच थांबली व त्यातून दोन इसम उतरून चंदानी यांच्याकडे धावून आले. प्रसंगावधान राखून चंदानी यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून पळ काढला. याचवेळी त्यांनी मदतीसाठी ओरड केली. त्यामुळे या चोरट्यांचा प्रयत्न फसला. दोन्ही चोरट्यांनी तोंडावर कापड बांधून घेतले होते. चोरट्यांनी चंदानी यांच्या दुचाकीवर अडकवून असलेली कागदपत्रे व काही रक्कम असलेली पिशवी बळकावली. चंदानी यांनी आरडाओरड करताच चोरट्यांनी धूम ठोकली. शहरातील गुरुनानक वार्ड ही सिंधी समाजाचे उद्योजक तथा मोठ्या व्यावसायिकांची वस्ती आहे. येथे राहणारे सर्वच व्यापारी याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…