पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दि. १८.०१.२०२३ रोजी चंदननगर पुणे परीसरात उघडया पत्र्याचे शेड मध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १० इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४२,७९०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा ११ इसमांविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. २५/२०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे..
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…