नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महानगर पालिकेच्या मालकीच्या महापौर निवासाचा वापर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठका घेण्यासाठी केला जात आहे. अशा आशयाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याकरिता सबंध कोकण प्रांतात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मात्र, या आचारसंहिता काळात ठाणे शहरात आचारसंहितेचा भंग केला जात आहे.
ठाण्याच्या महापौरांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या ‘महापौर निवास’ मध्ये आचारसंहितेचा भंग केला जात आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून विविध बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे समजते. अशा पद्धतीने शासकीय वास्तूचा म्हणजेच महापौर निवासाचा वापर करणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून महापौर निवास या वास्तूचा वापर करुन आचारसंहिता भंग केली जात असल्याने आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची चौकशी करावी व संबधितावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत; अन्यथा, ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही आगामी 48 तासात कारवाई न केल्यास ठामपा आयुक्तांवर लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 129 (1) अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…