पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मुंबई तील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले. यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले.

मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ७ मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणाचा शुभारंभ याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी भांडुप येथील ३६० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव येथील ३०६ खाटांचे रुग्णालय तसेच ओशिवरा येथील १५२ खाटांच्या प्रसूतीगृहाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदीजींच्या शुभ हस्ते पार पडला.
याशिवाय मुंबई महानगरपालिका हद्दीतील २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण देखील त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सव्वा लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. मुंबई शहराला एक सुंदर आणि सुनियोजित दर्जाचे आंतरराष्ट्रीय शहर बनवणे आणि त्याचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यासमयी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सुक्ष्म लघु आणि अवजड उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार तसेच बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लाखो कार्यकर्ते आणि मुंबईकर मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago