युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ (नागपूर)
मो. न. 9527526914
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- 16 जाने 2023 हा जतिरामजी बर्वे यांचा 39 वा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनी शून्य मैल, नागपुर येथील त्यांच्या पुतळयासमोर नतमस्तक होण्यासाठी अनेक समाज बांधवानी हजेरी लावली. तसेच विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय पदाधिकारी, राजकीय नेते इत्यादिनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यात प्रामुख्याने जतिरामजी बर्वे यांचे दोन्ही सुपुत्र अशोकजी बर्वे, आमदार परिणय फुके (माजी मंत्री), आमदार सुनील केदार (माजी मंत्री) अन्य मान्यवारांची उपस्थिति होती.
याप्रसंगी जतिराम बर्वे स्मृति प्रतिष्ठान द्वारा संविधान चौक नागपुर येथे आयोजित मच्छिमारांच्या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना रामटेक मतदारसंघाचे खासदार कृपालजी तुमाने म्हणाले की देश्याच्या स्वातंत्र्य लढयात बर्वेसाहेब यांचे मोठे योगदान आहे तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य विसरता येत नाही. तसेच मच्छीमार समाजाच्या सामाजिक व आर्थिक कल्याणसाठी गांव पातळी पासून ते राष्ट्रीय स्तरा पर्यन्त मच्छीमार संस्थाची बांधनी करुन एक संघ केले. देश्यातिल नैसर्गिक जल स्त्रोतांचा योग्य वापर व्हावा व त्यातून पारंपरिक मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटावे, अशी व्यवस्था निर्माण केली. तर रामटेकचे आमदार आशीष जैसवाल म्हणाले की जतिरामजी बर्वे यांनी 1943 मध्ये रामटेक येथे स्थापित केलेली फिशरमैन सोसायटी कडून नवीन शासन निर्णयानुसार खिंडसी जलाशय काढण्यात आला व त्यामुळे संस्थेच्या दोन हजार सभासदांवर उपजीवीकेचे प्रश्न निर्माण झाले, ही शोकांतिका आहे. आज ठेकेदार, खाजगी कंपनी, भाण्डवलदार इत्यादिनी पारंपरिक मछिमारांच्या व्यवसायावर अतिक्रमण करुन संस्था व शासकीय तलाव, जलाशय बळकावित आहेत.
आमदार परिणय फुके व आमदार सुनील केदार यांच्या सोबत झालेल्या चर्चेत शून्य मैल येथील विदर्भ संघाची वास्तु 17 डिसे 2017 रोजी मेट्रोसाठी लागत असल्याचे सांगून जमीनदोस्त करण्यात आली. त्याऐवजी दूसरी जागा देवू म्हणून सरकारद्वारा दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही वा शून्य मैल येथून हेरिटेज वाक करण्याचा प्रस्ताव कोर्टाने रद्द केल्यामुळे ती जागा तशीच पडून आहे. तेव्हा ती जागा विदर्भ संघाला परत करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सरकार सोबत चर्चा करण्यास पुढाकार घेण्याचे मान्य करण्यात आले. याप्रसंगी जातिराम बर्वे स्मृति प्रतिष्ठानचे अशोक बर्वे, चंद्रलाल मेश्राम (माजी न्याय. व सदस्य मागासवर्ग आयोग), दीनानाथ वाघमारे (संघर्ष वाहिनी), लकारिया, गजेंद्र चाचरकर, चित्रा बाथम (कानपुर), उमेश कोर्राम (स्टूडेंट्स एसोसिएशन ऑफ इंडिया), मीनाक्षी गेडाम, अड़ धानुजी वलथरे, प्रकाश डायरे (माजी सह.संचालक), प्रभाकर मांढरे इत्यादि अनेक वक्त्यांची भाषणे झाली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…