युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ (नागपूर)
मो. न. 9527526914
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुश्री बहन कुमारी मायावतीजी यांचा 67 वा वाढदिवस 15 मार्च रोजी जनकल्याणकारी दिवस म्हणून नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मदिन महोत्सव महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे यांचे अध्यक्षतेखाली उर्वेला कॉलनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, कॅडर टीचर गोपाल खंबाळकर, जिल्हा प्रभारी नरेश वासनिक, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, डॉ शितल नाईक, माजी शहराध्यक्ष राजीव भांगे, माजी मनपा पक्षनेता गौतम पाटील, बामसेफ चे ऍड अतुल पाटील, महिला नेत्या प्रियाताई गोंडाने, सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, सुनंदाताई नितनवरे, ताराताई गौरखेडे आदींनी 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहन मायावतीजी यांना देशाच्या प्रधानमंत्री बनवण्यासाठी जय भीम जय संविधानची घोषणा करून अहोरात्र कार्य करण्याची शपथ घेतली.
या प्रसंगी उत्तर नागपूरचे जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे विकास नारायणे, पश्चिम नागपूरचे मनोज निकाळजे, दक्षिण पश्चिमचे व ओपूल तामगडगे, पूर्व नागपूरचे मुकेश मेश्राम, मध्य नागपूरचे विलास पाटील, हिंगण्याचे शशिकांत मेश्राम, सावनेरचे अभिलेश नागधवणे, काटोलचे सावलदास गजभिये, कामठीचे चंद्रगुप्त रंगारी आदींनी बहणजिंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जनकल्याणकारी दिवसा निमित्ताने कार्यक्रमात प्रामुख्याने आयोजकांच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने गरीब, निराधार, विधवा, बेरोजगार, अपंग आदी गरजूंना विविध प्रकारच्या वस्तूंचे तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यावेळी भव्य केक, 67 किलो लड्डूंचे वाटप व विविध प्रकारच्या वस्तूंचे गरजूंना वाटप हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी तर समारोप जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…