युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर :- येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई वडिलांना आपल्याच पोटच्या सहा वर्षीय चिमुकलीला भूतबाधा झाल्याच्या संशयातून व त्यातून मुक्तता करण्याच्या बहाण्याने तिला जबर मारहाण केली. त्यात ती गंभीररित्या जखमी होऊन आखरी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर येथील सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षाची अल्पवयीन मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची तबीयेत ठीक नाही राहत असल्यामुळे व ती सतत आजारी राहत असल्याकारणाने तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी एका भोंदू बाबाकडून तिच्यावर अघोरी प्रकारचे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय चिमुकलीला कमरेला बघायचा बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला.
आपली मुलगी निपचित पडली, तिची हालचाल बंद झाल्याचे पाहून आई-वडिलांनी घाबरले, आणि लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ आणि आपल्याला आता पोलिस पकडणार या भीतीने मुलीचे मृतदेह नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरात ठेवून तिथून प्रसार झाले.
पोलिसांनी ठोकल्या बेळ्या..
आपल्या पोटच्या मुलीचा मृत्यूदेह बेवारस सोडून आई वडिला प्रसार झाल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली.
मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आहे.याप्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर या प्रकरणाला पुढील तपास करत असून नागपुरात घडलेल्या घटनेनं संपात व्यक्त केला जातोय.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…