पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

यूनिट -१, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे:- कोयता तसेच इतर घातक हत्यारे घेवुन गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी युनिट व सर्व पोलीस स्टेशनचे पोलीसांना ठोस कायदेशीर कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी वेळोवेळी आदेश केले आहेत. त्याअनुशंगाने दि. १७/०१/२०२३ रोजी युनिट-१ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार युनिट-१ चे कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार, अनिकेत बाबर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे खलीद सैय्यद, रा. कोंढवा, पुणे याचे काही महिन्यांपूर्वी त्याचे ओळखीचा मुलगा नामे सलमान, रा. मोमीनपुरा याचे बरोबर भांडणे झाली होती. तेव्हा सलमान याने खलीद यास तुला खलास करून टाकीन अशी धमकी दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी खलीद सैय्यद व त्याचे साथीदार त्या दिवसापासून त्यांचेजवळ घातक शस्त्र बाळगली असून ते सर्वजन सलमान याचा खुन करण्याचे तयारीत असून ते दिनांक १७/०१/२०२३ रोजी त्यांचे साथीदाराचे रहाते घरी गोयल गार्डन पाठीमागे, पत्र्याचे शेड मध्ये कोंढवा, पुणे येथे एकत्रीत जमणार आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती.

त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देवून, त्या अनुशंगाने वरिष्ठ अधिकारी यांनी युनिट-१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसे आदेशीत केले होते. त्याप्रमाणे गोयल गार्डन पाठीमागे, पत्र्याचे शेडमध्ये कोंढवा, पुणे येथे छापा टाकून इसम नामे १) समीर सलीम शेख, वय- १९ वर्ष, रा. गल्ली नं. २, कोंढवा पुणे २) शाहीद फरीद शेख, वय-२६ वर्ष, रा. स.नं.२६१, कोंढवा, पुणे ( अटक) व त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून २,३००/- रु किंची हत्यारे त्यामध्ये एक कु-हाड, कोयता, दोन गुप्त्या व एक तलवार अशी घातक शस्त्रे जप्त करून ताब्यात घेण्यात आले… त्यांचेविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरनं. ६४/२०२३ भादवि कलम १२० (ब), ११५, आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पो. का. कलम ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वर नमुद ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षित बालक यांना पुढील तपासकामी कोंढवा पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १, पुणे शहर श्री गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पो.उप निरी. अजय जाधव,पो.उप निरी. सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, अभिनव लडकत, अय्याज दड्डीकर,इम्रान शेख, तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंखे, महिला पोलीस अंमलदार, रुक्साना नदाफ यांचे
पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago