तळेगाव दाभाडे येथील भरदिवसा पडलेल्या दरोडयातील आरोपी गजाआड पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी

पुणे :- तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे हददीत दिनांक 10/1/2023 रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास 5 अनोळखी इसमांनी भरदिवसा दरोडा टाकुन 24 तोळे सोने व रोख रक्कम इतर मौल्यवान ऐवज चोरी करून मळुन गेले होते. सदर बाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. 17/2023 भा.दं.वि. कलम 395 452,323,506 (2) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) सह 135, शस्त्र अधिनियम 325, 425 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस पथकांना व पिंपरी चिंचवड हददीतील सर्व पोलीस ठाण्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा लवकरात लगकर उघडकीस आणुन आरोपीना अटक करणे बाबत आदेश देण्यात आले होते. सदर गुन्हयाचा तपास मा. वरीष्ठांनी गुन्हे शाखा युनिट 3 कडे वर्ग केला. गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोहवा /479 विठठल सानप व पोशि/ 2877 रामदास मेरगळ यांना गुन्हयामध्ये सहभाग असणारे आरोपींबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून सापळा रचुन सदर गुन्हयातील आरोपी 1) अमर हरिदास दहातोंडे वय 20 वर्षे, रा. वडाळा ता.नेवासा जि.अहमदनगर सध्या रा. चिवळीफाटा, बर्गेवस्ती, यशवंत जाधव यांचे खोलीत ता.खेड जि.पुणे 2)अनिल गोरखनाथ मस्के वय 30 वर्षे, रा. चिवळी फाटा, बर्गेवस्ती यशवंत जाधव यांचे खोलीत भाडयाने मुळ रा. समतानगर,
(बारवाई) ता. पनवेल जि. रायगड 3) राजु रविशंकर यादव वय 42 वर्षे, रा. तळेगांव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ जि. पुणे
मुळ रा. उत्तप्रदेश 4) सोपान अर्जुन ढवळे वय 24 वर्षे सध्या रा. तळेगांव दाभाडे, गणपती चीक, ता. मावळ जि. पुणे. मुळ

रा. शहारा ता.लोणार जि. बुलढाणा 5) प्रशांत राजु काकडे वय 30 वर्षे, रा. तळेगांव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ जि. पुणे यांना गुन्हे शाखा युनिट 3 ने अटक केले आहे. सदर गुन्हयातील आरोपी राजु रविशंकर यादव हा अलिबाग पोलीस ठाणे गु.र.नं. 18 / 2012 भा.दं.वि. कलम 395, 34,120 ब, या गुन्हयात 8 वर्षे जेल मध्ये राहून मोका गुन्हयातुन जामिनावर सन 2020 मध्ये सुटला आहे. तसेच अनिल मस्के हा पनवेल पोलीस ठाणे गु.र.नं. 64/2014 भा. दं. वि. कलम 302, 34 मधुन जामिनावर आहे.

यातील आरोपी नामे राजु यादव व सोपान उसळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने ते पैश्याची जमवामयी करीत असताना तळेगांव परीसरात फिरत असताना त्यांना समजले की. फिर्यादी हे पूर्वी गुटख्याचे व्यापारी होते ते पूर्वी जेल मध्ये असल्याने त्यांचे घरी भरपुर काळा पैसा दडवून ठेवलेला आहे असे समजले नंतर राजु यादव व त्याचे साथीदार अनिल मस्के, अमर दहातोंडे, प्रशांत काकडे, सोपान ढवळे यांनी संगनमत कट करुन हत्यारांची जमवाजमवी करून सदरचा दरोडा त्यांनी टाकलेचे त्यांनी कबुल केले आहे.

तसेच इतर दोन आरोपी नामे अनिल मस्के व अमर दहातोंडे यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिचवड आयुक्तालय हददीतील चाकण, आळंदी, दिघी, मोरारी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परीसरातील एकुण 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे सांगुन सदर आरोपीकडून सदर चैनरनचिंग गुन्हयातील एकुण 190 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत.

याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने एकुण 5 आरोपी अटक करुन एक दरोडयाचा गुन्हा, 12 पैन स्नॅचिंगचे गुन्हे, गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल जप्त करून एक गोटर सायकल चोरी लोणीकंद पो स्टे घा गुन्हा उघड. एकुण 02 पिस्तुले 22 जिवंत काडतुसे, 1,00,00/- रुपये रोख रक्म 430 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करून एकूण 25.27,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह. पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋखीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

6 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

18 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

18 hours ago