श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करन्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील एका महिला नायब तहसीलदाराला दिवसा ढवळ्या भररस्त्यामध्ये पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना समोर येताच बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
केज येथील तहसीलच्या नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्यासोबत ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आशा वाघ या केज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एका चारचाकी वाहनाने त्यांना रस्त्यामध्ये थांबवले, त्यानंतर चार जणांनी तेथून खाली उतरून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशा वाघ थोडक्यात बचावल्या आहेत. सध्या त्याच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधीही कौटुंबिक वादातून त्याच्या भावाने त्याच्यावर असा हल्ला केला होता. सध्या या घटनेने संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. मध्यंतरी पेट्रोल ओतून महिला अधिकाऱ्याला जाळल्याची घटना ऐकून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…