हाक तुमची, साथ आमची :- अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन..!!
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील लगाम चेक येथे काल दिनांक 20 जानेवारी ला एल.सी.प्लेअर्स क्रिडा मंडळ लगाम चेक द्वारा आयोजित भव्य 30 यार्ड टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजीत करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटक राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा माजी पालकमंत्री जिल्हा गडचिरोली, कार्यक्रमाचे सह उद्घाटक सौ. माधुरीताई उरेते जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली तथा माजी समाज कल्याण सभापती गडचिरोली, कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. साधनाताई मडावी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय चुटुगूंटा , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हनुमंत आत्राम, सौ. सिडाम अंगणवाडी पर्यवेक्षिका, खेवले मुख्याध्यापक रा.ध.हायस्कुल लगाम, वैष्णव ठाकुर सामाजिक कार्यकर्ते, विकास सडमेक, नारायण पेंदाम, श्री.मनोज आचारी तसेच राजे धर्मराव हायस्कुलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घघाटनीय भाषणात अम्ब्रिशराव आत्राम मनाले युवा हेच भारताचे भविष्य आहे. युवकांना शिक्षणासोबतच खेळ आवश्यक आहे. खेळ हा जिवनात अत्यंत आवश्यक आहे, खेळासाठी मी मदत व सहकार्य करण्यास केव्हाही तयार आहो. मी सत्तेत नसताना ही आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. आजचे युवक उद्याचे भविष्य आहेत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हाच ते जिल्हाचा, राज्याचं आणि देशाचा नाव रोशन करु शकतात. कधीही हाक द्या मी मदतीसाठी नेहमी तयार आहे असे प्रतिपादन राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी उद्घाटनीय भाषणातून केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज आचारी यांनी प्रास्ताविक भाषणातून क्रीडा स्पर्धेची रुपरेषा मांडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ठाकरे सर यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल सी प्लेअर्स क्रिडा मंडळ लगाम चेक चे पदाधिकारी व सर्व सदस्य खुप परिश्रम घेतले. यावेळी गावातील सर्व गावकरी मंडळी, महिला ,व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…