युनिट 6 चा पुन्हा दणका…पुणे शहरात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपिंना गुन्हे शाखा युनिट ६ ने केले जेरबंद…..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर

पुणे :- शहरात धारदार शस्त्रे बाळगणे व त्याचे साह्याने गून्हे करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याची उपाय योजना म्हणून युनिट मधील स्टाफ सोबत मीटिंग घेऊन आज रोजी 15/00 ते रोजी 21/00 वा. दरम्यान हद्दिमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवने बाबत सूचना देउन स्टाफ सोबत खालील कारवाई केली.

1) *कोंबींग ऑपरेशन राबवत असताना बातमी मिळली की, व्हॉट्स ॲप वर, इंस्टाग्राम वर कोयत्या सारख्या हत्याराचे स्टेटस ठेऊन समाजात दहशत पसरवनारा आरोपी नामे 1) जिवन सूर्यकांत घाडगे वय 22 वर्ष रा – गोसावी वस्ती, कवडी पाट, लोणी काळभोर पुणे.यास कवडी पाट टोल जवळ सार्वजानिक रोड वर लोणी काळभोर पुणे येथे ताब्यात घेतले. तेव्हा त्याचे जवळ कोयता मिळून आल्याने त्याचेवर लोणी काळभोर पो. स्टे. येथे आर्म ॲक्ट कलम 4(25) म.पो.का.क.37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करत आहे.

1)कुख्यात गुंड शुभम कामठे गँग (S.K. साम्राज्य ग्रूप)* चा सदस्य विधी संगर्ष बालक हा कोयता घेऊन फिरत आहे. तेव्हा त्यास तारमळा, लोणी काळभोर  पुणे येथे सार्वजनिक रोड वर  ताब्यात घेतले तेव्हा त्याचे जवळ लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याचेवर लोणी काळभोर  पो. स्टे  येथे आर्म ॲक्ट कलम 4(25) म.पो.का.क.37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळ भोर  पोलीस करत आहेत.
2)कोंबींग ऑपरेशन  राबवत असताना  बातमी मिळालेवरून कोयत्यासह फिरणारा,  *कुख्यात गुंड शुभम कामठे गँग (S.K. साम्राज्य ग्रूप)* चा सक्रीय सदस्य  असणारा अरोपी नामे *संस्कार विलास वाघमारे वय- 22वर्ष रा- गुजर वस्ती, टोल जवळ,लोणी काळभोर पुणे*  यास थेऊर फाट्या जवळ ता - हवेली, पुणे येथे सार्वजनिक रोड वर  ताब्यात घेतले तेव्हा त्याचे ताब्यातील एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याचेवर लोणी काळभोर  पो. स्टे  येथे आर्म ॲक्ट कलम 4(25) म.पो.का.क.37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

  त्याचप्रमाणे, कोयत्यासह फिरणारा   *कुख्यात गुंड शुभम कामठे गँग (S.K. साम्राज्य ग्रूप)* चा सक्रीय सदस्य  असणारा अरोपी नामे *अनिकेत सुनिल गायकवाड  वय- 21वर्ष रा- गुजर वस्ती, टोल जवळ,लोणी काळभोर पुणे*  यास कदम वाक वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ, लोणी काळभोर, पुणे येथे सार्वजनिक रोड वर  ताब्यात घेतले तेव्हा त्याचे ताब्यात एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याचेवर लोणी काळभोर  पो. स्टे  येथे आर्म ॲक्ट कलम 4(25) म.पो.का.क.37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

सदरची उल्लेखनिय कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनीश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरी. सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, ऋषिकेश टिळेकर, मच्छिंद्र वाळके, ऋषीकेश व्यवहारे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दुर्गापूर येथे 13 नोव्हेंबरला जाहीर सभा* *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ करणार संबोधित

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…

6 hours ago

विकासाच्या बाबतीत भेजगाव ठरणार आदर्श गाव, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…

19 hours ago

हिंगणघाट मतदार संघात भाजप उमेदवार कुणावार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…

19 hours ago

बापाच्या विजयासाठी लेक मैदानात: आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन.

गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

19 hours ago

बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात कॉंग्रेस – भाजपात तुल्यबळ लढत.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…

1 day ago

आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध* *- ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…

1 day ago