नाशिक येथे देहविक्रीचा कुंटणखानावर पोलिसांची कारवाई, परराज्यातील महिलांचा ही समावेश.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- देहविक्रीचा व्यवसाय करण्याचे ठिकाण म्हणजेच कुंटणखाना. त्याला महाराष्ट्रात कायदेशीर परवानगी नाही. तरीही अनेक ठिकाणी राजरोसपणे कुंटणखाना छुप्या पद्धतीने किंवा हप्ते देऊन हा व्यवसाय केला जात आहे. या सर्व अवैध व्यवसायाला आशीर्वाद कुणाचा हा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो.

पोलीसांच्या निदर्शनास आल्यास पोलीस कारवाई करतील. त्यामुळे पोलिसांना कुठलीही खबर न लागू देता कुंटणखाना चालविण्याचे अनेकजण धाडस करतात. असेच धाडस नाशिकमधील एका नामांकित हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका बंगल्यात काही जणांनी केले होते. द्वारका परिसर खरंतर शहरातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण म्हणून ओळखला जातो. याच परिसरात हा कुंटणखाना एका बंगल्यात सुरू होता. विशेष म्हणजे या कुंटणखान्यांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहेत. परंतु तरीही राजरोसपणे हा कुंटणखाना सुरू होता. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने नुकतीच याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. तीन पुरुषांसह पाच महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या सुचनेवरुन मुंबई नाका पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेतले असून मोबाईल, दुचाकी आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा कुंटणखाना होता. मुंबई-आग्रा महामार्गाच्या लगतची ही कारवाई करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नाशिक शहरात खरंतर मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची जोरदार चर्चा होती, त्याच काळात पोलीसांनी द्वारका परिसरात ही कारवाई केल्यानं अवैध प्रकारे कुंटणखाना चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

कुंटणखाना चालविण्यासाठी परराज्यातील महिलांचा मोठा सहभाग असल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत याबाबत स्पष्टता नसली तरी पुरुष मात्र स्थानिक असल्याचेच समोर आले आहे. नाशिक शहर पोलीसांनी केलेली ही कारवाई शहरात चर्चेचा विषय असली तरी नाशिक शहर पोलीसांनी अशा स्वरूपाचे कुठे अवैध धंदे सुरू असल्यास पोलीसांना माहीती देण्याचे आवाहन केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

9 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

9 hours ago