पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाळुंगे पोलीस स्टेशन पि. चि.
पिंपरी चिंचवड :- महाळुंगे पोलीस चौकी हद्दीमध्ये रात्रगस्त करणारे पो. शि/ बाळकृष्ण पाटोळे व पोशि/ शरद खेरें यांना मौजे महाळुंगे, ता-खेड, जि-पुणे गावचे हदीत हिंगलाज स्टोअर्स दुकानासमोर एक ३५ वर्षीय इसमाचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन केलेल्या अवस्थेतील प्रेत मिळुन आले. घटनास्थळाचे आजुबाजुचे लोकांकडे तपास करता खुन झालेल्या इसमाचे नाव दिपक काशिराम राठोड, वय अंदाजे ३५ वर्ष रा-वाशिम असे असल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात आरोपी विरुध्द चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा रजि नंबर ११८/ २०२३ मा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महाळुंगे पोलीस चौकीचे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री किशोर पाटील यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवुन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना अज्ञात आरोपीचे शोधा करीता सुचना व मार्गदर्शन केले.
मयत दिपक काशिराम राठोड हा आरोपी विठ्ठल मंगेश चव्हाण वय २२ वर्ष मुळगाव आंधबोरी, ता-किनवट, जि-नांदेड याचे सोबत महाळुंगे येथे रूम करून राहत असल्याचे व ते दोघेजन रात्री दारु पिवुन एकत्र चायनिज गाडयावर जेवणासाठी आले असता त्यांचेमध्ये किरकोळ कारणावरून बाद झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक तासाचे आधारे आरोपी विठ्ठल मंगेश चव्हाण शोध घेत असताना तो नांदेड येथे मुलगाची पळुन जाण्याचे तयारी असताना मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने किरकोळ वादातून मयत दिपक राठोड यांचे सोबत झटापट झालेवर त्यास रोडवर खाली पाडुन त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली. त्यास दिनांक २०/ ०१ / २०२३ रोजी ११:३० वा अटक करण्यात आली आहे. सध्या सदरचा आरोपी दिनांक २४/०१/२०२३ पावेतो पोलीस कस्टडीमध्ये आहे.अटक आरोपीचे नाव -विठ्ठल मंगेश चव्हाण, वय २२ वर्ष, मुळगाव आंधबोरी, ता-किनवट, जि-नदिङ
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-जायुक्त परिमंडळ-१ श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अंमलदार राजु राठोड, विठ्ठल वडेकर, प्रशांत ठोंबरे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे, सचिन माने, भाग्यश्री जमदाडे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…