✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- मकर संक्रांतीमुळे माळीवाडा बस स्थानकात पोलिसांनी मॉकड्रिलच आयोजन केलं होते. पण पोलीसांचा या मॉकड्रिलमुळे समाजात मुस्लिमद्वेष पसरविण्याचे आरोप होत आहे. त्यामुळे या मॉकड्रिलवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या पोलीस मॉकड्रिलची दिवसभर चर्चा रंगली होती. त्याच बरोबर खरी चर्चा होती ती मॉकड्रिल मध्ये पोलीस शिपाई अतिरेकी भूमिका बजावत होता. पोलीसांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार पोलिसांनी त्यास पकडल्या नंतर त्यास पोलीस अटक करून पोलीस व्हॅनकडे एस.टी स्टँड बाहेर घेऊन जात असताना अतिरेकी भूमिकेतील पोलीस शिपाई हा ”नारा ए तकबिर अल्लाहु’ जोराने ओरडत होता. म्हणजेच तो सरकारी पोलीस जर अतिरेकी भूमिका निभावताना ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ म्हणतो या बाबतचा व्हिडीओ पाहिल्या नंतर पोलीस मॉकड्रिलच्या पोलिसी स्क्रिप्ट नुसार अतिरेकी हा मुस्लिम समाजाचा असतो हे समाज मनावर बिंबविण्याचा जाणूनबुजून दाखविले गेले आहेत. मुसलमानाला अतिरेकी, देशद्रोही असतात असाच संदेश तर सरकारी पोलिसाना द्यायचा नव्हता? असे प्रश्न आज समाजातून विचारल्या जात आहे.
अतिरेकी हा फक्त मुसलमान असतो का? अस म्हटल जाते की, अतिरेक्यांचा कोणताही धर्म नसतो, मग अहमदनगर शहरातील महाराष्ट्र पोलिसात मुस्लिम द्वेषाला कोण खतपाणी घालतोय किंवा मुस्लिमद्वेष पासरविणाऱ्या विचारसरणी संघटनेचा पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी कार्यरत आहे काय? या बाबत मोठी शंका निर्माण होत आहे.
‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ ही घोषणा अतिरेकी म्हणून कार्यरत असलेला सरकारी पोलीस शिपाई ओरडतो तेंव्हा अहमदनगर शहरातील बस स्थानकात उपस्थित असणारी प्रत्येक नॉन मुस्लिम समाजातील बस प्रवासी वा तेथील साधा वडापाव विक्रेतेच्या मनात खोल घर केल असेल नारा ए तकबिर अल्लाहु अकबर म्हणणारा मुसलमान हा अतिरेकी किंवा अतिरेकी विचाराचा असतो. या मॉकड्रिल मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक नॉन मुस्लिम पोलीसाला खात्रीच पटली असेल की ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ घोषणा देणारी व्यक्ति हे अतिरेकी विचारांचे समर्थन करणारेच असतील. अशा प्रकारामुळे पोलिसांमध्ये पूर्वग्रहदूषित निर्माण होत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…