बऱ्याच पुरुषांचा फ्लर्ट करण्यात आणि फेसबुकी जगाचा विचार केला तर फ्लर्टी, मिश्किल कॉमेंट करण्यात हातखंडा असतो. प्रत्यक्ष भेटल्यावर फ्लर्ट करणारे मोजके असले तरी कॉमेंट्स मधुन फ्लर्ट करणारांची संख्या जास्त आहे. काही स्त्रियांकडे पण ही कला असते. फ्लर्टी कॉमेंट्सला फ्लर्टी उत्तर देणे पण जमले की तो संवाद खेळकर होतो.
फ्लर्टी कॉमेंट्स संवाद हा हवा हवासा वाटणारा मनाला मोह घालणारा असतो. असा खेळकर संवाद स्त्रीला आवडतो, ते फ्लर्टिंग हवहवसं चैतन्य देणारं वाटतं. आपण खास आहोत ही जाणीव होते. ती जाणीव प्रत्येक व्यक्तीला हवी असते. अजुन थोडं पुढं सरकली तर ती त्याची ऑनलाइन येण्याची वाट बघू लागते. हा फ्लर्टी खेळकर संवाद साधता साधता तिच्या ही नकळत ती त्याच्या प्रेमात पडते. त्यावेळी तो आपल्या प्रमाणेच तो इतर स्त्रियांना पण फ्लर्ट करतो याकडे तिचे दुर्लक्ष होते आणि आपणच खास वाटायला लागते.पण तो मात्र 10 ठिकाणी खड़े मारत असतो.
हिचा प्रतिसाद त्याला दिसला की तो हळूच प्रपोज करतो, कधी ती स्वतः करते. थोड़े दिवस इनबॉक्स मध्ये गुलू गुलू गप्पा, संधी मिळाली तर एखादी डेट. पण इनबॉक्स मधील गप्पा त्याला चार चौघात करता येत नाहीत त्यामुळे तो टाळतो. इकडे आपले बिंग फुटू नये म्हणून कुठे समारंभात भेट झाली तरी तीला सोडून इतरांशी जास्त संवाद करतो. आता ते फेसबुक, इनबॉक्स आणि प्रत्यक्षातले सगळीकडे तीला फ्लर्ट करणे त्याने बंद केलेले असते. बिंग फुटू नये याची तो काळजी घेत असतो. दुसरीकडे इतर जणींना पहिल्या प्रमाणेच फ्लर्ट करणे सुरु असते. आता तिची गोची होते. ना तो इनबॉक्स मध्ये हवा तेंव्हा सापडतो अगदी इकडे एक्टिव्ह असला तरी. ना त्याचे ते हवेहवेसे वाटणारे फ्लर्टिंग तिला मिळते.
त्याच्या प्रेमात तर ती बुडून गेलेली असते. तिला मानसिक त्रास व्हायला लागतो. इतर महिलांशी त्याचे चाललेले फ्लर्टिंग, चेष्टा,मस्करी बघुन तिला मत्सर वाटायला लागतो,तिला ते खटकायला लागते. ‘ना इधर के रहे ना उधर के रहे’ अशी अवस्था तिची होऊन बसते. ना मैत्री राहिली ना प्रेमाचे नाते राहिले. मग तिच्या तक्रारी सुरु होतात. त्यातली त्यात एखादी त्याच्या सारखच फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट असणारी त्याला जास्तच खेटायला आली की हिचा जीव कासाविस होतो. तो मात्र बेफ़िकीर. ना तिच्या रडण्याचा, ना तिच्या जिव लावण्याचा, ना तिच्या कासाविस होण्याचा परिणाम होतो.
तिला आपण वेळ देत नाहीत, संवाद संपत चालला आहे याविषयी तो बिनधास्त असतो. मस्त फ्लर्टिंग वर्टिंग करून महिलांत पॉप्युलर असतो. “आम्ही फक्त चेष्टेत बोलतोय, तुला पटत नसेल तर ब्रेक अप कर.मला असली बंधनं नकोयत.” असे तोडून बोलायला सुरुवात करतो. ती अधिक निराश होते. अगदी वर्ष दोन वर्ष लागतात महिलांना यातुन सावरायला.
त्यामुळे खुप जणींशी फ्लर्ट करणारा गोड़बोल्या खुप जणी त्याला रिस्पॉन्स देत असताना आपल्याला प्रपोज करतो किंवा आपण प्रपोज केले तर त्याला होकार देत असेल तर हूरळून जायचेच नाही. त्याला सर्वच फुलांवरचा मध हवा असतो. त्याच्या एखाद्या मैत्रिणीशी त्याची खुपच लगट चालली असेल तर तो तिने अक्षेप घेतला तर तो तिला सोडतो मैत्रिणीला नाही, कारण त्याला बंधन नको असते आणि अशी मैत्रीण त्याला बंधन घालत नसते. त्याच्या सोबत अजुन 10 जणाला ती फ्लर्ट करत असेल तर उलट त्याला तेच परवड़ते. हा तिला बंधन घालणार नाही आणि ती याला घालणार नाही ओन्ली एन्जॉय आणि त्याला तेच हवे असते. त्यामुळे खुप छान छान फ्लर्ट करणाराला तसच छान छान फ्लर्टी उत्तर द्या पण लांबच ठेवा. मनस्तापा शिवाय काहीच निष्पन्न होत नाही त्यातुन.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…