युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष भगवान चांदेकर यांचा 48 वा वाढदिवस विविध संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस अरून भाऊ वाहने, जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय अन्याय निवारण समितीचे विदर्भाचे सचिव महेंद्रजी सातपुते, महाराष्ट्र संदेश न्यूजचे विदर्भ ब्युरो चीफ युवराजजी मेश्राम, ज्येष्ठ विचारवंत सेवकराम राऊत , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विधानसभा अध्यक्ष संजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष भुजंगराव मोजणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर यांच्या सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल प्रकाश टाकला आणि केक कापून पुष्पगुच्छ देऊन भविष्यात पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करिता सिद्धार्थ मांडवी, संतोष पुष्परे, साळवे वैशाली वाहने, ब्राह्मणी ग्रामपंचायत सदस्य व आदींनी सहकार्य केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…