खुनाच्या प्रयत्नाच्या व दुखापतीच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे :- दि. २१/०१/२०२३ रोजी चंदननगर पो.स्टे कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मातोश्री सोसायटीचे समोरील मोकळ्या मैदानामध्ये नागपाल रोड, चंदननगर पुणे येथे एक इसम संशयीतरीत्या ऊभा असून, त्याचेकडे कोयत्या सारखे एक हत्यार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने वरीष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचा एक इसम तेथे उभा असल्याचे दिसल्याचे स्टाफला पाहताच तो तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, सर्व स्टाफने त्यास शिताफीने जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव हुसेन युनोस शेख, वय- १९ वर्षे, रा. शंकर गवळी यांचे गोठ्याचे शेजारी लक्ष्मीनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले, अंगझडतीमध्ये त्याचे कंबरेला मागील बाजुस पॅन्टचे आतमध्ये खोचलेले एक लोखंडी कोयता हे हत्यार मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध अंमलदार नामदेव गडदरे यांनी चंदननगर पो.स्टे गु.र.न ३२ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान हुसेन शेख याने कोरेगाव पार्क पो.स्टे गु.र.न १२८ / २०२२ भादवि कलम ३०७, १४६, १४७, १४८, १४९, व विमानतळ पो स्टे गु.र.नं ४९५ / २०२२ भदवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ असे गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यास अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. शशिकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सौ, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शना खाली पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार- सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago