नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांनी वाढत असणाऱ्या,प्रशासनाचा लगाम नसलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना ठणकावत कडक भूमिका घेतली होती पण आयुक्तांच्या आदेशाला मानतील ते स्थानिक अधिकारी/ कर्मचारी कसले,४८ तासात पुन्हा भूमाफिया यांनी मागील दोन दिवसाचा बॅकलॉग भरून काढत अनधिकृत बांधकाम चा वेग वाढवला व आयुक्त, नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे सुरू केली आहे.
तक्रारी असो व नसो दररोज अनधिकृत बांधकाम वर कारवाई करा व रोज अवहाल पाठवा असे आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असतांना मात्र स्थानिक(सद्या सर्वच मुख्यमंत्री)नेते यांना हाताची,भागीदारी देउन मात्र कागदपत्रे खोटा व्यक्ती उभे करून अनधिकृत बांधकाम सुरू ठेवली आहे.
कळव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे दिवसरात्र सुरु आहेत तसेच आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असतांना सुद्धा भ्रष्ट अधिकारी, स्थानिक गावकी भावकिचे नेते व भूमाफिया यांच्या भ्रष्ट युती कळव्यात कोरोडो रुपयांची अनधिकृत उलाढाल करीत आहेत.
जागा मालकांना विविध आमिष दाखवून नंतर फसवणूक करून भूमाफिया दिसेल त्या जमिनीवर मग त्या शासकीय, आरक्षित किंवा अगदी आदिवासी जमिनीवर विना परवानगी अनधिकृत बांधकामे आठ माळ्याचे निकृष्ठ दर्जाचे अगदी तीन महिन्यांत उभे करत असून भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची जबाबदारी मात्र अनधिकृत बांधकामे न रोखू शकणाऱ्या मनपा आयुक्तांच्या कडे नक्कीच जाते अशी ठाणेकर/ कळवेकरां मध्ये चर्चा आहे. स्थानिक प्रशासन सोईनुसार कारवाई करत असून सुपारी घेऊन जवळच्या वर थाटातूरमाथुर कारवाई इतरांना वर मोठी तोड कारवाई करण्याची तसेच कळव्यात संदीप नावाचा कामगार अनधिकृत बांधकाम फोटो काढून नंतर चहापाणी आठवणी ने भूमाफिया कडून घेतो व कारवाई दरम्यान दिवसभर एकच वीट तोडून चहापाणी देणाऱ्या चा चहाला(मिठाला)जागतो असं कळव्यात म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम जमीन सातबारा मालक व बोगस बिल्डर यांच्या वर ही गुन्हे लवकर कळव्यात दाखल होत नाहीत कारण अनधिकृत बांधकामे पूर्ण होण्यास पुरेसा वेळ देत आहे असा आरोप प्रशासनावर होत आहे.
आयुक्त बांगर हे नवी मुंबई मनपा आयुक्त असतांना अनधिकृत बांधकामे विरोधात मोठी मोहीम यशस्वी राबविली होती मग ठाण्यात/ कळव्यात का गप्प सवाल नागरिक करतांना दिसतात. शनिवार/ रविवारी अनधिकृत बांधकामे पूर्ण करून सर्व सामान्य नागरिकांना फसवणूक करून घरात गुसवून, भूमाफिया नियम, कायदे, धाब्यावर बसवून भूमाफिया यशस्वी होत आहेत.
आयुक्त साहेब शनिवार/ रविवारी जरा सदर ठिकाणी फिरा किंवा नागरिकांना थेट आव्हान करा की अनधिकृत बांधकाम चे व्हिडिओ/ फोटो थेट तुम्हाला पाठविण्याचे मग बघा तुमची फोन मेमरी फुल होते की नाही. साहेब लोकांचे जीव वाचवा ही विनंती सर्व स्तरातून आपणांस होत आहे दखल घ्यावी. अशी मागणी नागरिक करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…