डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता.२३:- गेल्या महिन्यापासून आकुर्डीतील बबन पांढरकर चाळ पंचतारा नगर पांढरकर या वस्तीत भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे .साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घराचा कडीकोंयडा त्यांच्या खिशातील पाकिटा मधील पैसे मोबाईल लंपास करण्यापर्यंत या भुरट्या चोरांची मजल गेली आहे वाहन पार्क केलेल्या रहिवाशांच्या दुचाकीच्या डिकी मधून देखील महत्त्वाची कागदपत्रे पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार दि.२३ रोजी पहाटे सात वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारची घटना उघडकीस आली आहे. चाळीतील एका रहिवाशीची पॅन्ट रस्त्यावर पडलेले आढळून आली ही पॅंट तिथे कशी आली या गोंधळात असताना त्या रहिवाशाच्या पॅंटीच्या खिशात पैशाचे पाकीट नसल्याचे लक्षात आले. पाकीट मध्ये पैसे व्यतिरिक्त महत्त्वाची कागदपत्रे असल्याने नुसत्या विचाराने ते रहिवासी असतं अस्वस्थ झाले. इकडे तिकडे शोधाशोध केली तरी देखील पाकीट मिळाले नाही पैसे गेल्याचे दुःख नव्हते, मात्र पाकिटात असलेले लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, महत्त्वाच्या पावत्या, अधिक कागदपत्रे हरवल्याने जीव कासावीस झाला होता. क्षणभर काय करावे काही सुचले नाही. चोर हा इमानदार असल्याचा प्रत्यय या घटनेमध्ये रहिवाशांना आला घरातील त्या सर्वसामान्य नागरिकाच्या लटकवलेल्या पॅंटीच्या खिशातील पाकिटातील पैसे त्याने चोरले. नंतर पैसे घेऊन पाकिटातील कागदपत्रे रस्त्यावर फेकून दिली शोधाशोध करीत असताना रस्त्याच्या कडेला कागदपत्रे पडलेले दिसताच त्या रहिवाशाचा जीव भांड्यात पडला. रहिवाशाच्या जीवात जीव आला. परमेश्वर चोराला देखील सद्बुद्धी देत असतो. हे या घटनेनंतर सिद्ध झाले. या इमानदार चोराची चर्चा दिवसभर मात्र परिसरात चांगलीच रंगली होती.
२५ डिसेंबरच्या रात्री देखील येथील एका रहिवाशाच्या दुचाकीच्या चिकित्सा ठेवलेले तब्बल ०१ लाखाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती.आजूबाजूला चौकशी केली शोधाशोध केली तरी देखील पैशाचा सुगावा लागला नाही. रुग्णालयातील उपचारासाठी तसेच घर बांधकाम खर्चासाठी पै-पै करून ही रक्कम जमा केली होती. आकुर्डी गावठाण परिसरात सोन्या काळभोर, खाऱ्या जगताप, बॉबी यादव यासारख्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांची आजही दहशत पहावयास मिळते. सध्या या टोळ्या शांत असल्या तरी त्यांची पिलावळ आणि हस्तक जोमात आहेत. दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार हद्दीत कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. तरी देखील या परिसरात पहाटेच्या वेळेस हे टोळके खुलेआम फिरत असते. पोलिसांनी गस्त वाढवण्याची आणि अशा भुरट्या चोरांच्या मुस्क्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नाही.
🟠महाराष्ट्र संदेश न्यूज🟠
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…