मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- हिवाळ्यात बरेच ठिकाणी नाटकांचे आयोजन केले जातात. आपल्या भागात तीन अंकी नाटकाचे बरेच शौकीन आहेत.अनेक नाटक आजही नावाने चालतात.मात्र, एखादं नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्वाची असते असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
जय सेवा नाट्य कला मंडळ जिमलगट्टा यांच्या सौजन्याने 22 जानेवारी रोजी येथील एफडीसीएम च्या भव्य पटांगणात आयोजित कशी तोडू मी मंगळसूत्र…? या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून येथील सरपंच पंकज तलांडे, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच व्यंकटेश मेडी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता मेडी,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश मद्दरलावार, पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना नाटक या मनोरंजनाच्या माध्यमाने खरंतर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अगदी संगीत रंगभूमीपासून ते हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांना आजही मराठी प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळेच नाट्यप्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत.कशी तोडू मी मंगळसूत्र ? हे नाट्यप्रयोग पारिवारिक असल्याने युवा पिढीने यातून चांगल्या गोष्टी आत्मसात करावे असे आवाहनही भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…