पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हिंजवडी पोलीस स्टेशन पि.ची.
पुणे:- मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांचे दिनांक ०९/०१/२०२३ रोजी चे प्रतिबंधात्मक आदेशाच्या अन्यये कोणीही इसम बिना परयाना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही शस्त्र, सोटे भाले, चाकु सुरा कोयता तलवारी, दंड काठया चंदुका व शरीरीक इजा करता येईल अशी कोणीतीही वस्तु जवळ न बाळगणे असे प्रतिबंधक आदेश असलेने त्या अनुशंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ प त्यांचा स्टाफ असे काल दिनांक २२/०१/२०१३ रोजी दुपारी पोलीस स्टेशन हदिदत पेट्रोलींग करीत असताना सुसगाव येथे प्रकाशनगर चौकात एक इसम जवळ पारधार कोयता बाळगुन दहशत करीत असलेबाबत माहीती मिळालेने सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ यांनी त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी तात्काळ जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडील हत्यार काढून घेतले व त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महा.पो.अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कारवाई केली आहे.
त्यांनतर सायंकाळी देखील सुसगाव ठकसेननगर येथे रस्त्यावर दुसरा आणखी एक इसम जवळ धारधार कोयता चाळगुन दहशत करीत असलेबाबत माहीती मिळालेने सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ यांनी त्यांचे स्टाफसह सदर ठिकणी तात्काळ जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडील धारदार हत्यार कोयता काढुन घेतले व त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महा. पो. अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कारवाई केली आहे. सदर इसमांना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ यांनी त्यांचे स्टाफसह सुसगाव येथे तात्काळ जाऊन कारवाई केलेने त्यांचे हातुन दखलपात्र गुन्हा होणे पासुन प्रतिबंध केला आहे. तसेच सदरचे अरोपी हातात कोयता हत्यार घेऊन काढलेले फोटो सोशल मिडीयावरुन टाकुन देखील दहशत माजवत होते. त्या लोखंडी कोयता जवळ बाळगुन दहशत करणारे इसमांची नावे खालीलप्रमाणे १) आकाश दयानंद गायकवाड वय १९ वर्षे, सध्या रा गोटया चांदेरे यांचे खोलीत भाडयाने ठकसेननगर सुसगाव ता. मुळशी जिल्हा-पुणे मुळ पत्ता रा.मु पो.तिरे ता.सोलापुर
२) विजय भगवान आडे वय १९ वर्षे, सध्या रा.आप्पा सुतार यांचे खोलीत भाडयाने शिवबा चौक सुसगाव ता. मुळशी जिल्हा-पुणे मुळ पत्ता रा. देवीनगर तांडा गंगाखेड ता. गंगाखेड जिल्हा परभणी
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. मनोजकुमार लोहीया सह. पोलीस आयुक्त सो, मा. डॉ संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त सो. मा. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि. २, मा. श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा.पो.फौजदार महेश वायबसे, पोहेकॉ / १०४१ संतोष डामसे, पोहेकॉ / ११८८ सोमवंशी पोलीस अमलदार / २६५९ रवी पवार यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…