पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- फरासखाना पोलीस ठाणे गुरनं १५/२०२३ परकीय नागरीक आदेश १९४८ वा नियम क्रमांक ३(१) सह परकीय नागरीक कायदा कलम १४ व पासपोर्ट अधिनियम १९५० चे कलम ३६ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात एक बांग्लादेशी जोडप्यामधील पुरुषारा दिनांक २०/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1 ) ज्वेल अख्तरअली खान वय २६ वर्ष रा. शेख बारी, गांव फुकरा, पोस्ट फुकरा, ता. काशीयानी जि. गोपलगंज बांग्लादेश २) एक महिला वय २१ वर्ष रा. सिलीपुर, पोस्ट केंदुआ, ता. केंदुआ जि. नेत्रकोना बांग्लादेश अशी आहेत
दिनांक २०/०१/२०१३ रोजी एक बांग्लादेशी जोडपे बुधवार पेठ परिसरामध्ये संशयितरीत्या फिरत असलेबाबत माहिती प्राप्त झालेवर शुक्रवार पेठ पोलीस चौकीचे अधिकारी सपोनि मनोज अभंग यांना मिळाली असता ती त्यांनी योनि श्री शब्दीर सय्यद यांना कळविले असता त्यांनी लागलीच सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सपोनि मनोज अभंग, मपोउनि किर्ती म्हस्के व स्टाफ यांनी त्यांचा शुक्रवार पेठ व बुधवार पेठ भागात पायी पेट्रोलिंग फिरून शोध घेतला असता संशयित जोडपे हे क्रांती हाटेल चौक या ठिकाणी मिळून आले. त्यांना हटकले असता ते कावरेबावरे होवून तेथून निघुन जाण्याचा प्रयत्न करू लागले असता त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता पुरुषाकडे असलेल्या खाकी पर्समध्ये महिलेचा बांग्लादेशी शाळा सोडल्याचा दाखला व पुरुषाचे बांग्लदेशाचे नॅशनल आयडी कार्ड मिळून आल्याने त्याची उपस्थित बंगाली भाषेचे ज्ञान असणा-या महिलेकडून खात्री करून घेण्यात आलेली आहे सदरचे जोडपे हे बांग्लादेशी नागरीक असल्याचे निष्पन्न झाले असून सदर जोडण्याकडे पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे नसल्याने सदर बाबत पोलीस अंमलदार नारायण चलसाणी फरासखाना पोलीस ठाणे, पुणे यांनी फिर्याद दिलेली आहे.
नमुद्र गुन्हयात अटक आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक-र, शिवाजीनगर, पुणे येथे हजर केले असता सदर आरोपीना मा न्यायालयाने दिनांक २२/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास सपोनि श्री. मनोज अभंग, फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, पुणे शहर, श्री संदिप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फराराखाना विभाग, पुणे शहर, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे श्री. शब्बीर सय्यद, सपोनि श्री मनोज अभंग, मपोउनि श्रीमती किर्ती म्हस्के, पोलीस अंमलदार नारायण चलसाणी. सचिन खाडे, सोनवणे यांनी केलेली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…