मुजाअली यांनी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस घडणा-या सायबर गुन्ह्यांविषयी अवगत करून सतर्क राहण्याचे आवाहन केले
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- चांदा पब्लिक स्कूल येथे सायबर सुरक्षा आणि जागरूकता, तसेच ‘पोक्सो कायदा’ याची माहिती हेतु पुरस्पर वर्ग 9 वी आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीमती अश्विनी वाकडे, मुन्नावर अली, संतोष पानघाटे, सायबर सेल, भरोसा सेल, क्राइम ब्रांच चंद्रपूर, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे माजी अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाला, सचिव संतोष तेलंग आणि युथ प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती स्मिता संजय जीवतोडे तसेच शाळेच्या प्रधानाचार्या सौ. आम्रपाली पडोळे उपस्थित होते.
सायबर सेल, भरोसा सेल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तिची भावना निर्माण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ अभियाना अंतर्गत कार्यक्रमाच्या सुरवातीस बँड पथकाचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी श्रीमती अश्विनी वाकडे यांनी लैंगिक अत्याचार आणि चाईल्ड पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी ‘पोक्सो’ हा कायदा तयार करण्यात आला आणि हा कायदा नोव्हेंबर 2012 मध्ये अस्तित्वात आला असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल अवगत केले.
मुजावर अली याांनी नी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस घडणाया सायबर गुन्ह्यांविषयी अवगत करून सतर्क राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. मंजुषा गौरकार तर आभार प्रदर्शन सौ. शुभांगी वाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…