अकोला जिल्हातील आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टरवर कारवाई करा: उमेश इंगळे यांची मागणी.

या सर्व लोकांच्या हलगर्जी मुळे घडल असते लहान बालकांचं हत्याकांड.

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील सारकिन्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टरवर कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम सारकिन्ही येथील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार म्हणून देणाऱ्या खिचडी मधून ऐकून 14 विद्यार्थ्यांना आणि 4 महिलांना विषबाधा झाली, बाधित झालेल्या रुग्णांना गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेले असता, आरोग्य उपकेंद्राला कुलूप आढळले, त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन महान येथे उपचारासाठी नेले, तेथे वैधकिय अधिकारी डॉ. आशिष इंगळे, आरोग्य सेवक नवलकर, यांनी उपचार केले. आता सर्व बधितांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकिय अधिकारी इंगळे यांनी सांगितले.

सारकिन्ही येथील अंगणवाडी मध्ये ऐकून 30 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 30 पैकी बरेच विद्यार्थी गैरहजर असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. शनिवारी सकाळी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी शिजवायला टाकली. त्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्या गंजामध्ये पाल पडली आणि ती पूर्ण शिजली आणि तीच खिचडी मुलांना खाण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी लक्ष्य संतोष आंबेकर वय 5 वर्षे याचे डब्यात पाल आढळली, त्या वेळी ऐकच हल्ला कल्लोळ होऊन गावात चर्चा पसरली, ग्राम पंचायत कर्मचारी, आदी गावातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना प्रथम गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी आणले, त्यावेळी आरोग्य सेविका मंगला भगत ह्या गैरहजर असल्याचे दिसून आल्या. त्यानंतर लगेच महान प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार्थ दखल केले. यामध्ये 4 महिला आणि 12 मुले असल्याची माहिती आहे. वैधकीय अधिकारी इंगळे यांनी सर्वांच्या तब्येती चांगल्या असल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविका गोदावरी पवार आणि मदतनीस म्हणून मीना खंडारे ह्या असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व दोषी विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या वतीने केली आहे. गैरहजर असलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले, ॲड. रोशन तायडे, आकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

5 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

18 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

1 hour ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago