पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता दिलेल्या सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे दिनांक २१/०१/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पो. हवा. १३०५ प्रविण उत्तेकर व पो. हवा. १४४४ संदिप शिर्के यांना त्यांच बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे पुणे नगर रोडवरील सातव हायस्कुल बसस्टॉप समोर वाघोली ता हवेली जि पुणे येथे गावठी पिस्तुल विक्री करण्या करीता येणार आहे.” अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी तसेच स्टाफ यांनी सापळा रचुन दोन इसमांना ताब्यात घेतले असता इसम नामे १) शुभम शांताराम शिसवाल, वय १९ वर्षे, रा. गांधीनगर मुगर रोड खंडवा मध्यप्रदेश २) सनी संजय जेधे, वय २४ वर्षे, रा हाऊन नंबर १ सिध्दार्थ नगर ई वॉर्ड लोणावळा पुणे यांनी बेकायदेशीररित्या ०१ . गावठी बनावटीचा कट्टा .रु.२०,०००/- व दोन मोबाईल फोन कि रु ६५०००/- असा एकुण ८५०००/- रु चा ऐवज व अग्निशस्त्र जवळ बाळगले असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन गु. र. नं. ६३/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. श्री गजानन टोम्पे मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील मा.श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…