लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची कामगिरी पुण्यात भारी..कुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या पूर्व तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव मोडुन काढला.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर

पुणे :- सदर बाबत अधिक माहीती अशी की, मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार सो यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारले नंतर लागलीच त्यांनी आयुक्तालयातील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये त्याच प्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये त्याच प्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चोऱ्या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटण करणे याबाबतचा आदेश पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

मा. वरीष्ठांच्या आदेशाचे तसेच २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे अनुशंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये दि. २३/०१/२०२३ रोजी रात्री तपास पथक अधिकारी पोउपनि अमित गोरे व तपास पथकातील स्टाफ असे हॉटेल, लॉज चेक करणे, तसेच पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेणेकामी पेट्रोलींग करत असताना दि. २४/०१/२०२३ रोजी ०२/१० वा चे सुमारास ११२ नंबरवरुन लोणीटाऊन रात्रपाळी बीट मार्शल कर्मचारी पोशि आडके व पोशि भगत यांना कॉल प्राप्त झाला की, “७ ते ८ इसम हे म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे जवळ हत्यारासह थांबले असून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत” वगैरे माहीती प्राप्त झाल्याने बीट मार्शन यांनी रात्र गस्त अधिकारी पोउपनि वैभव मोरे यांना सदर बाबत कळविले असता त्यांनी या बाबत मा. दत्तात्रय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पो स्टे पुणे यांना कळविले. तेंव्हा मा. वपोनि यांनी तपास पथकासह घटनास्थळी जावुन सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने तपास पथकातील पोउपनि गोरे पोहवा आनंद पाटोळे, पौना श्रीनाथ जाधव, पोशि शैलेश कुदळे, पोशि बाजीराव बीर पोशि नितेश मुंडे, तसेच रात्रगस्त अधिकारी पोउपनि वैभव मोरे व लोणी टाऊन बीट मार्शल कर्मचारी पोशि आडके, पोशि भगत असे दोन पंचासह घटनास्थळी गेले असता म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजवे पलीकडे उजव्या बाजुस वळणावर पाच ते सहा इसमांमध्ये धावपळ उडुन ते त्या ठिकाणाहून पळुन जात होते. त्या वेळी वरील प्रमाणे पोलीस स्टाफने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोउपनि गोरे यांनी सदर इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) प्रेम राजु लोंढे वय १९ वर्षे रा. रेल्वे गेट जवळ आळंदी रोड ता हवेली जि पुणे मुळ रा. जामखेड, गोरोबा थीएटर जवळ, अहमदनगर (२) ऋषिकेश उत्तम लोंढे वय २६ वर्षे रा. पानमळा रोड ता हवेली जि पुणे मुळ रा. बावळगाव जि बिड (३) गणेश भगवान खलसे वय २२ वर्षे रा. माळवाडी कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे (४) तानाजी भाऊसाहेब गावडे वय २३ वर्षे रा. माळवाडी कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे अशी कळविली. उर्वरीत दोन इसम हे अंधाराचा फायदा घेवून तेथेन पळुन गेले. ताब्यात घेतलेले इसम है लोणीकाळभोर पो स्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोउपनि गोरे यांनी दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता

वर नमुद आरोपीतांच्या जवळ २ लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु मिळुन आल्याने पोउपनि गोरे यांनी पंचा समक्ष इसम नामे प्रेम राजु लोंढे वय १९ वर्षे यास त्यांच्या ताब्यात मिळुन आलेल्या सदर वस्तु वाचत विचारपुस केली असता प्रेम लोंढे यांने सांगीतले की, “तो व त्याचे पाच साथीदार मिळून कुंजीरवाडी येथील अॅटोकॉर्नर एच पी पेट्रोल पंप, ता हवेली जि पुणे या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी जात असले बाबत कबुली दिल्याने सदर आरोपीतां विरोधामध्ये लोणीकाळभोर पो स्टे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अमित गोरे हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५. मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे पोउपनि वैभव मोरे व त्यांचे सोयत पोहवा नितीन गायकवाड, पोहवा आनंद पाटोळे, पोना सुनिल नागलोत, पो ना श्रीनाथ जाधव, पोशि नितेश पुंडे, पोशि शैलेश कुदळे, पोशि निखील पवार, पोशि दिपक सोनवणे, पोशि बाजीराव वीर, मपोशि विश्रांती फणसे पोशि भगत व पोशि आडके यांचे पथकाने केली आहे…

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

12 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

24 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago