जळगाव जिल्हात २५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ ने ठोकल्या बेड्या.

✒️ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील अमळनेर तालुक्यातील निम येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका ग्रामसेवकांनी लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केले आहे आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील वय ५५ वर्ष राह. सुरभी कॉलनी असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.

निम येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील याने वीटभट्टी चालकाकडून २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून ग्रामसेवकास अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार २७ वर्षीय इसामाने याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. विटभट्टी चालकास ना हरकत दाखला देण्यासाठी १७ जानेवारीस ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सोमवारी (ता. २३) नीम ग्रामपंचायत कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदारांचा नीम ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३० वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय आहे.

तक्रारदारांनी नियमाप्रमाणे अमळनेर तहसील कार्यालयात ६ हजार रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदारांना नीम ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसाय करायचा असेल; तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगितले. तसेच नीम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक राजेंद्र पाटील याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. लाच मागणी केलेल्या रकमेपैकी २५ हजार रोख रक्कम पंचासमक्ष नीम ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: स्वीकारताना पकडण्यात आले आहे. मारवड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगाव शशिकांत पाटील, सहसापळा अधिकारी व पथक पोलिस अधीक्षक संजोग बच्छाव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, कारवाई मदत पथक पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago