संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर व महात्मा गांधी स्काॅलर्स अकॅडेमी गडचांदूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वसंतोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन – २०२३ अंतर्गत विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात एकूण २५ शाळेच्या विद्यार्थ्यांच्या नृत्य समुहाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या समुहनृत्यासाठी इन्फंट कॉन्व्हेंट चे नृत्य शिक्षक श्रीनिवास आरेवार, रितु संतोरे यांनी मार्गदर्शन केले.
विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थी, नृत्य शिक्षक यांचे विशेष अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गांनी अभिनंदन केले आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…