निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव:- संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालित राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा चे संस्थापक सचिव सन्माननीय उत्तमराव मोहितकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सांस्कृतीक व बक्षिस वितरण कार्यक्रम ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर आयोजित सांस्कृतीक व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा चे संस्थापक सचिव सन्माननीय उत्तमराव मोहितकर साहेब, तर प्रमूख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील वराराकर तसेच सर्व सदस्य गण उपस्थीत होते. तसेच प्रमूख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे सहसचिव विजयराव ताजने, उपाध्यक्ष माननिय नामदेव पाटील गोहणे, भोयगांवच्या प्रथम नागरिक सौ. शालिनीताई बोंडे आणि सर्व सदस्य गण, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव चे मुख्याध्यापक श्री. रत्नमाल सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँड पथकासह विद्यालयातून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रथमतः स्काऊट गाईड पथकाने स्काऊट ध्वजाचे ध्वजारोहण केले. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव चे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री. रत्नमाल सर यांनी केले. तर ग्रामपंचायत मध्ये श्रीमती निताताई गुंजेकर यांनी ध्वजारोहण केले. दोनही शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी गावातील मुख्य मार्गांनी फिरत राजेंद्र विद्यालयाच्या प्रांगणात सर्व अबाल वृद्धांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात भारत की बेटी या गितावरील नृत्याने झाली. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोंडी गीत, कोळी गीत, लावणी यावर नृत्य सादर केले. बाल कामगार यावर तुषार गोहने यांनी नक्कल सादर केली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मानसी वरारकर व शशिकांत आत्राम यांच्या एकल नृत्यावर बक्षिसांचा जणू वर्षाव झाला. राजेंद्र विद्यालयाद्वारे सत्र 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे प्रथम बक्षिस रू.201, द्वितीय बक्षिस रू.151, तृतीय बक्षिस रू. 101 व प्रोत्साहन पर बक्षीस रू. 101 रोख स्वरूपात देवून विदयार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमराव बळवंतराव मोहितकर सचिव संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी प्रत्येकांनी आपले कर्तव्य कार्यतत्पर राहून पूर्ण करावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आव्हान केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. जी.एम. लांडे यांनी तर आभार श्री. डी. डी. ठाकरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थीत होता.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…