वर्धा: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण.

विरपत्नी, विरमातांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
 पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान
 सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट संचलन पुरस्कार

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.26:- 74व्या भारतीय प्रजासत्ताकाच्या दिनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अपर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.

यावेळी विरपत्नी व विरमातांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या कायाकल्प योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणाला प्रथम पुरस्कार तर प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर, हमदापूर, जळगाव, अल्लीपूर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील डॉ. आशिष देशपांडे व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. अभ्युदय मेघे यांना पुरस्कार देण्यात आले.

हिंगणघाट पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटणकर, उपनिरिक्षक सोमनाथ टापरे, उपनिरिक्षक पपीन रामटेके व पुलगाव पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस अंमलदार सिमा दुबे यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय जांबोरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल रुग्वेद वघळे व संघ तसेच राजस्थान येथील पालीमध्ये आयोजित 18 व्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल रितीका नेवारे चाणक्य स्कुल, विशाखा सायंकार राणी लक्ष्मीबाई संघ, धिरज सायंकार भगतसिह ग्रुप, चेतन वानखेडे जगजिवनराम हायस्कुल, ओम निकोडे यशोदिप कॉन्व्हेंट, घृणेश्वरी ढाले एसएसएनजे महाविद्यालय व मोहिनी मसराम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात झालेल्या पथसंचलनात उत्कृष्ट पथसंचलनाचा प्रथम पुरस्कार पोलिस मुख्यालय, द्वितीय पुरस्कार एनसीसी पथक तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार बीडीएम कॉन्व्हेंटला देण्यात आला. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रथम पुरस्कार न्यु इंग्लीश हायस्कुल, द्वितीय अग्रग्रामी हास्कुल तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सेंट ॲथोनी स्कुलला देण्यात आला.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

8 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

8 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

9 hours ago