✒️उषा कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि.२४ जाने:- मागील अनेक दिवसांपासून भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र होणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात होती. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युवतीची घोषणा झाल्यामुळे संपूर्ण राज्यातील कार्यकर्ता मध्ये नवा जोश दिसून येत आहे.
हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी आणि वैचारिक प्रदुषण संपवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा काल शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून झाल्याने मिरज तालुक्यातील इनाम धामणी मधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शिवसेना- वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा होताच -शिवसेना युवासेनेचे तालुका प्रमुख भरत कुमार पाटील व वंचित बहुजन युवक आघाडी सांगली जिल्हा संघटक मानतेश कांबळे यांनी युतीचे स्वागत केले.
यावेळी मिरज तालुका संघटक प्रमोद मल्लाडे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, संकेत कोलप, राजू वडेर, ऋषिकेश कांबळे, राहुल कोलप, सतीश कट्टीमनी इतर शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…