उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एक्स आर्मी मॅन बाळकृष्ण घाडगे व प्राध्यापक एडवोकेट नितीन पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एक्स आर्मीमॅन डी.आर. कांबळे सर, संतोष हुलेरे सर, राजमाने सर यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भिसे यांनी केले. पाहुणे परिचय आयु.चंद्रकांत नागवंशी यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार विजय लांडगे यांनी मांडले.आयु. स्वराज्य धेंडे यांच्या वाढदिवस निमित्त दादासाहेब धेंडे यांनी सर्वांसाठी अल्पोपहार दिला. आज ज्याचे वाढदिवस होते त्यांना विहाराच्या वतीने गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बुद्ध विहाराचे सचिव पवन वाघमारे यांनी संविधान गौरव परिषद कुपवाड येथे कार्यक्रमास हजर राहण्याबाबत निवेदन दिले. कार्यक्रमास श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, उपासक ,उपासिका व सर्व मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रम सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात साजरा झाला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…