नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आणि सत्तांतरानंतर शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच गुरुवारी ठाण्यात आले होते. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी थेट बंड केलेल्या शिंदे गटाला आव्हान केलं आहे. लवकरात लवकर ठाण्यात एक प्रचंड मोठी जाहीर सभा घेऊन समाचार घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. जैन समाजाच्या मुनींचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी जैन बांधवांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुनाखाली हे जे काही लांडगे घुसले गेले ते विकले गेले. यामुळे महाराष्ट्रासोबत शिवसेनेची बदनामी झाली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे, धगधगणारे शिवसैनिक शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि माझ्यासोबत राहिलेत. हे निखारेच उद्या महाराष्ट्रात मशाल पेटवणार आहेत. अन्यायावरती लाथ मारा हे तर शिवसैनिकांचं ब्रीद वाक्य आहेच. पण त्याच बरोबरीनं शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं की, ८० टक्के समाजसेवा २० टक्के राजकारण. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक ते इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावानं विकले गेले हे काही सांगण्याची गरज नाही. लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीरसभा घेणार म्हणजे घेणारचं. आणि त्यावेळेला कोणाचा काय तो समाचार घ्यायचा आहे तो घेईन.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…