सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 26/01/2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण माननीय बी. बी. भगत मुख्याध्यापक यांचे हस्ते संपन्न झाले. स्काऊट गाईडचे शिक्षक श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी अगुवाई केली. प्रथमता: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांची मंचावर उपस्थिती होती.
त्यानंतर शाळेचे विद्यार्थी कु. त्रिशाली पप्पू महानंद हिने ” जहाॅ डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा “, अथर्व नितेश हिकरे याने ” संदेशे आते है “, पवन चौधरी याने ” वो देश मेरे ” आणि कु. रूपाली मनोज निमकर हिने ” वतन आबाद रहे तू ” आदी देशभक्तीपर गीत गायन केलेत.
त्यानंतर दिनांक: 19 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत घेण्यात आलेल्या बौद्धिक, क्रीडा स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी स्व. पूजा ईश्वर गेडाम स्मृतिदिनानिमित्त (दिनांक: 27 डिसेंबर) गेडाम परिवारातर्फे सोनल ईश्वर गेडाम यांचे हस्ते शाळेला सतरंगी भेट देण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. आर. बी. अलाम, श्री. आर. के. वानखेडे, सोनल ईश्वर गेडाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री. आर. बी. अलाम व आभार सौ. एस. एन. लोधे मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमात श्री. यु. के. रांगणकर शिक्षक व श्री. जगदीश कांबळे श्री. वाल्मीक खोंडे, श्री. वामन बोबडे, श्री. सुरेश मोरे, श्री. इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि बुंदयाचे वाटप करण्यात आले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…