वर्धा बोरचे  ९ दरवाजे उघडणार, सतर्कतेचा इशारा

वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️आशिष अंबादे 🖊️

महाराष्ट्र संदेश न्युज वर्धा : प्रकल्पात येवा वाढल्याने सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे ९ दरवाजे ३० सेंमी सोमवारी सकाळी १० वाजता उघडण्यात येणार असून १७२ घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथील सतत च्या पाण्यामुळे नाल्याला पूर असून रस्ता बंद करण्यात आला आहे. रात्री 2 च्या सुमारास 3 घरा मध्ये पाणी गेले असता सदर व्यक्तींना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था  केली आहे.  कारंजा तालुक्यात रविवार पासून पडणाऱ्या सतत च्या पावसामुळे सावरडोह नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.  हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी हेटी रस्ता बंद झाला आहे.यशोदा नदीला पुर आल्यामुळे भगवा ते चानकी मार्ग बंद झाला आहे. पाणी पातळीत वाढ होत आहे. यशोदा नदीला पूर आल्यामुळे आलमडोह ते अल्लीपूर रस्ता बंद झाला आहे.  पावसामुळज हिंगणघाट पिंपळगाव रोड बंद झाला आहे.

विशाल सुरवाडे

Share
Published by
विशाल सुरवाडे

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago