खंडणी विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी.. माथाडीच्या नावाखाली बेकायदेशीर खंडणी मागणा-या दोन इसमांना अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- फिर्यादी यांचेकडे अँरो मॉल विमाननगर पुणे येथील साहित्याचे लोडींग अनलोडींगचे काम असताना दि. १२/०८/२०२२ रोजी ते दिनांक २५/०१/२०२३ रोजीच्या दरम्यान आरोपी नामे १) संकेत दिलीप गवळी, वय २९ वर्षे, रा. सुखवाणी रॉयल, बी बिल्डींग फैलट नं. २०१. एस-२ विमाननगर, पुणे २) अरुण शंकर बोदडे, वय ४८ वर्षे, रा. भैरव नगर, आयपा मंदिर जवळ, धानोरी रोड, पुणे, ३) नितीन एकनाथ कांबळे रा. लोहगाव पुणे यांनी आपआपसात संगणमत करून फिर्यादी यांना वरील नमूद ठिकाणी लोडींग अनलोडींग करु न देता गाड्यांची आडवणुक करुन कोणतीही वर्क ऑर्डर नसताना, नोंदणीकृत माथाडी कामगार नसताना कोणतेही काम न करता फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी यांचेकडे १,२६,०००/- रु. ची मागणी केल्याने फिर्यादी यांनी सदरबाबत तक्रारी अर्ज दि. २४/०१/२०२३ रोजी दिला होता.

मा. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे यांनी सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवून वेगवेगळी दोन पथक तयार केली व सापळा कारवाई करुन आरोपीतांना तडजोडीअंती फिर्यादी यांचेकडून २६ हजार रुपयांची खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडून त्यांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ४७/२०२३ भा.दं.वि. कलम ३८६.३८७,३४१३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्हयातील आरोपी क्र. १ व २ हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, खंडणी विरोधी पथक- २ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदशनाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, पवन भोसले, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

पुणे शहरातील व्यावसायिकांना अनाधिकृत माथाडी व खंडणी संदर्भात बेकायदेशीर पैशाची मागणी, आडवणूक होत असल्यास त्या संदर्भात संपर्क करण्याचे आवाहन पुणे शहर पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago