लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग.

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट

दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटुंब मानून, त्यांच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थाना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांना अपेक्षित असलेला तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षा त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपलं आयुष्य घडवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या परिक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होताहेत ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.

एक्झाम वॉरियर्स पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत

शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

14 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago