देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कान्होलीबारा येथील स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेतील विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने कान्होलीबारा येथे शिशिरोत्सव- 23 या वार्षिक दोन दिवासीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजण करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाट्न संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग याच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, उपसरपंच प्रशांत गव्हाळे,नामदेव येलूरे, हनुमान दुधबडे, वामनराव देवतळे, भगवान चाफडे, ताराचंद गेडाम, संतोष गव्हाळे, गणेश गिरडकर, मनोज खडसे, संजय महाले,प्राचार्य नितीन तुपेकर, शशिकांत मोहिते, मुख्याध्यापक होमराज शेंदरे,अधीक्षक विलास पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिशिरोत्सवात दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकल नृत्य,समूह नृत्य,ड्रामा आदी नेत्रदीपक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर आश्रम शाळेतील संस्कृती मोहिजे व स्व. देवकी बाई बंग विद्यालयातील वेदिका खोडतकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शाळेकरीता उल्लेखनीय कामगिरी साठी संस्थेतर्फे मनीषा ढोरे आश्रमशाळा व अश्लेषा मानकर स्व. देवकीबाई बंग विद्यालय यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पुरुषोत्तम काटोले यांनी सूत्रसंचालन केतन निखाडे व स्वाती घांगरेकर तर आभार मुख्याध्यापक संदीप कैलुके यांनी मानले. यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता स्व. देवकी बाई बंग इंग्रजी माध्यमिक विद्यालय व विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…