संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत आज दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सभागृहात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली व क्षेत्रातील मुलभूत समस्या सोडविण्याची मागणी केली.
यात प्रामुख्याने राजुरा तालुक्यातील भेंडाळा प्रकल्पाचे सन 1990 साली मंजूर झालेले काम अजूनही पुर्णत्वास आलेले नाही. तसेच पूर परिस्थितीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी केली. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग विभाग यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा स्वावलंबन योजना यासाठी निधीची तरतूद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात 42 टक्के वन असून वन परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांपासून नुकसान होत आहे. यात डुक्कर व अन्य प्राण्यांपासून पिकांचे होत असलेल्या नुकसानीचे भरपाई मिळणे संदर्भात तरतूद करून बंदोबस्त ठेवण्याचे वनविभागाला सूचित करण्यात यावे अशी मागणी केली. वना लगेचच्या गावांचा शामाप्रसाद मुखर्जी योजनेमध्ये समावेश करून प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचे संरक्षणासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष यांनी केली आहे.
या प्रसंगी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्याधिकारी विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…