✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पिंपळखुटा एचडीएफसी बँक शाखेतील इमारतीची भिंत फोडून आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने तिजोरीतील रोख पळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार बँक व्यवस्थापकाने खरांगणा पोलिसांकडे नोंदविली आहे.
अमरावती येथील रहिवासी असलेले प्रशांत गिरधर देशमुख हे सदर बँकेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी दिलेला तक्रारीनुसार अज्ञात आरोपीतांनी एचडीएफसी बँक शाखा, पिंपळखुटा येथील इमारतीची मागील भिंत फोडली. बँक कार्यालयाच्या आतील भागात प्रवेश करून बँकेचे तिजोरीतील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार खरांगणा पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवीत प्रकरण तपासावर ठेवले आहे.
बँक कार्यालयाची भिंत फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची बाब लक्षात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली आहे. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते आहे . खरांगणा पोलिसांनी भित फोडणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी सुरू आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…