✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात व शहर तालुक्यात सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीला उधाण आले आहे. वेळोवेळी कार्यवाहीचा बडगा उगारूनही सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर प्रतिबंध लागताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील व काही तालुका परिसरात पोलिसांनी सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यां वर कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा बेकायदेशीरपणे साठा करून त्याची विक्री करणाऱ्यांवर अनेकदा कार्यवाही करण्यात आली. परंतु सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या तस्करीला मात्र ब्रेक लागला नाही.
आज संपूर्ण जिल्हात सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याची तस्करी व अवैध विक्री करणारे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी व विक्रीच्या अवैध धंद्यात अनेकांचे हात गुंतले आहेत. तस्करीतून व अवैध विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेकांनी या धंद्यात उड्या घेतल्या आहेत. शहरातील बहुतांश पान टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा, गुटखा व पान मसाल्याची सर्रास विक्री केली जाते. खर्ऱ्याची तलब बाळगणाऱ्यांची वर्धा जिल्ह्यात व शहरात तालुक्यात मोठी संख्या आहे. खर्रा आता एक गरजेची वस्तू बनला आहे. पान टपऱ्यांवर खर्रा घेण्याकरता नंबर लावावे लागतात. प्रत्येक क्षेत्रातील लोक खर्ऱ्याची तलब बाळगतात. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीही यातून सुटले नाहीत. शासकीय व प्रशासकीय वर्गांमध्येही खर्रा खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रशासकीय कार्यालयांमध्येही तोंडात खर्रा चघळणारे नेहमी दृष्टीस पडतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तस्करी व अवैध विक्रीला उधाण आले आहे. ज्याच्या जवळ खर्रा नाही तो दोस्त बरा नाही असे म्हणणारे शहरात अनेक आहेत. त्यामुळे कार्यवाहीचा बडगा उगारूनही खर्रा खाणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने अवैध रित्या सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. अवैध विक्रेत्यांकडून तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करावे लागत असल्याने खऱ्यांच्या किमतीत वाढ होऊनही शौक मात्र कमी झालेले नाहीत. त्यामुळे मागणीच्या आधारावर पुरवठा करणारे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…