पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहरातील उदयोजक, व्यावसायिक यांची मिटींग घेऊन अनाधिकृत माथाडी व खंडणी संदर्भात बेकायदेशीर पैशाची मागणी. कोणी करीत असले तर त्या संदर्भात संपर्क करण्याचे आवाहन केले होते. अडवणूक सदर आवाहानास प्रतिसाद देत वारजे माळवाडी पुणे येथील हॉटेल व्यावसायिक यांना त्यांचे हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका येथे खोटे तक्रारी अर्ज दाखल करण्याची व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचेकडे ०२ लाख रुपयेची खंडणीची मागणी करणारा इसम सुभाष सहजराव, रा. उत्तमनगर पुणे व त्याचा साथीदार यांचेवर कारवाई करणे संदर्भात हॉटेल व्यावसायिक यांनी खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर येथे तक्रार दिली होती.
पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे यांनी वरिष्ठांचे आदेशान्वये सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवून वेग-वेगळी दोन पथक तयार केली.. सहा. पो. निरी. चांगदेव सजगणे व पो.उप निरी.मोहनदास जाधव यांनी सापळा रचुन आरोपी १ ) सुभाष अशोक सहजराव, वय ३५, रा. वारजे माळवाडी, पुणे २) बाळासाहेब हरीभाऊ लोणारे, वय- ५८. रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे यांना तडजोडीअंती तक्रार दार यांचेकडून दि.२८/०१/२०२३ रोजी ०५ लाख रुपयेची खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडुन शिवणे येथुन ताब्यात घेऊन त्यांचेविरुध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ०९/२०२३ भा.दं.वि. कलम ३८६,३८७,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्हयातील दोन्ही आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असून गुन्हयाचा तपास सुरु आहे…
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री.. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शाना खाली खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सहा.पो.निरीक्षक चांगदेव राजगणे, पोलीस उपनिरीक्षक, मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…